Home बातम्या विपश्यना सामूहिक साधना आणि परिचय शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

विपश्यना सामूहिक साधना आणि परिचय शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

कल्याण दि.१२ ऑगस्ट :
ज्यांनी धम्मगिरी ,धम्मवाहिनी समवेत देशभरातील विपश्यना केंद्रात १० दिवसीय विपश्यना शिबीर पूर्ण केलेल्या साधकांसाठी रविवारी 6 ऑगस्ट रोजी कल्याण पूर्वमधील नूतन विद्यालयमध्ये आयोजित सामूहिक साधना आणि नवी साधकांसाठी विपश्यना परिचय आनापान सराव शिबिराला कल्याण पूर्वेतील नागरिकरांनी चांगला प्रतिसाद दिला.

विपश्यना आचार्य श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहर, जिल्हा, राज्य, देश आणि जगभरात विपश्यना केंद्राच्या वतीने विविध कार्यक्रम सुरू आहेत. मुंबई परिसर विपश्यना केंद्र आणि सहयोग सामाजिक संस्था कल्याण पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेच्या नूतन विद्यालयात जुन्या साधकांसाठी सामूहिक साधना आणि नवीन साधकांसाठी विपश्यना परिचय आणि आनापान सती सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही सत्रात 50 हुन अधिक साधकांनी सहभाग घेत चांगला प्रतिसाद दिला .

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा