Home Tags Birthday

Tag: birthday

शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोवण्यासाठी डोंबिवलीत होणार जनसुविधा केंद्रांची स्थापना – राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

  डोंबिवली: १९ सप्टेंबर केंद्र सरकार व राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध जनहिताच्या योजनांची माहिती, लाभ नागरिकांना सहजपणे प्राप्त व्हावेत, या उद्देशाने डोंबिवली शहरात तब्बल पाच ‘ जनसुविधा केंद्रां’चे उद्घाटन करण्यात येणारआहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि बंदरे, तसेच अन्न पुरवठाव ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सर्वसमान्य नागरिकाचे जीवन सूकर व्हावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारद्वारे विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. मात्र पुरेशा माहिती अभावी या योजना अपेक्षित घटकापर्यंत पोहोचत नाहीत. शिवाय अशा योजनांच्या निकषांबाबतही बऱ्याचदा सामान्य माणून अनभिज्ञ असतो. ही बाब लक्षात घेत राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जनसुविधा केंद्राची संकल्पना राबविण्याचे ठरवले. सर्वसामान्य जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच संबंधित योजनांचा लाभ मिळवून देण्याचा या केंद्राचा प्रमुख उद्देश असणार आहे. यापैकी पहिले केंद्र हे राज्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालय, सावरकर रोड, डोंबिवली पूर्व येथे स्थापन केले जाणार असून दुसरे पूर्व मंडळ कार्यालय, तिसरे पश्चिम मंडळ कार्यालय येथे तर चौथे सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात असणारआहे. पाचवे जनसंपर्क केंद्र साई पॅराडाईज बिल्डिंग, गुप्ते रोड, डोंबिवली...