Home ठळक बातम्या मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील वाहतूकीमध्ये आजपासून बदल; असे आहेत सर्व बदल

मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील वाहतूकीमध्ये आजपासून बदल; असे आहेत सर्व बदल

ठाणे दि.13 ऑक्टोबर : 

ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नल ते हायपरसिटी मॉल, वाघबीळ ब्रिज, घोडबंदर रोड या ठिकाणी दि.13 ते 16 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.

या मार्गावर 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान वाहतूकीत बदल…
प्रवेश बंद – मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड/अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

(जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही गर्डर टाकण्याच्या वेळी आनंदनगर सिग्नल कटजवळ डावीकडे वळण घेवून सेवा (सर्व्हिस रोड) रस्त्याने पुढे हायपरसिटी मॉल कटजवळ उजवीकडे वळण घेवून मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.)

  • या वेळेमध्ये टाकण्यात येणार गर्डर –
  • 1) दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ०४.०० वाजे पर्यंत.
  •    २) दि.१४ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ०४.०० वाजे पर्यंत.
  • ३) दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ४.०० वाजे पर्यंत.

ही अधिसूचना वरील नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. तसेच वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर,  ऑक्सिजन गॅस वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.

 

कासारवडवली सिग्नल पेट्रोल पंप ते नागला बंदर सिग्नल दरम्यान
 12 ते 19 ऑक्टोंबर 2022 दरम्यान वाहतूकीत बदल

ठाणे शहरातील कासारवडवली सिग्नल पेट्रोल पंप ते नागला बंदर सिग्नल, घोडबंदर रोड या मार्गावर दि.12 ऑक्टोंबर ते 19 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत मेट्रो पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहितीही ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.

वाहतूकीत बदल पुढीलप्रमाणे…

            प्रवेश बंद – मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. (ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड़ अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव – टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

जड़ अवजड वाहने सोडून इतर वाहने ही पिलर क्रमांक ४ ते ५, ३३ ते ३४, ५५ ते ५६, ६९ ते ७० वर गर्डर टाकण्याचे वेळी कासारवडवली सिग्नल पेट्रोल पंप कट येथून डावीकडे वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे नागलाबंदर सिग्नल कट जवळ उजवे बाजूस वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.

गर्डर टाकण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे –

  •             (१) दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ०४.०० वाजे पर्यंत.
  • (२) दि.१३ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ०४.०० वाजे पर्यंत.
  •  (३) दि.१७ ऑक्टोबर २०२२ रोजी  रात्रौ२३.५५ वा. ते दि. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ०४.०० वाजे पर्यंत
  • (४) दि.१८ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्रौ २३.५५ वा. ने दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे ०४०० वाजे पर्यंत.

    ही वाहतूक अधिसूचना वर नमूद कालावधीदरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. तसेच पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ती लागू राहणार नाही.

 

घोडबंदर रोडवरील ठाणे वाहिनी (लेन) 16 ते 17 ऑक्टोंबर दरम्यान जड वाहनांसाठी बंद

मेट्रो मार्ग 4 च्या पिलरवर आनंदनगर सिग्नल कट ते वाघबीळ नाका पावेतो घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याच्या कामामुळे 16 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रौ 23.55 वा. ते दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 04.00 वाजेपर्यंत घोडबंदर रोडकडून ठाणेकडे जाणारी वाहिनी (लेन) जडअवजड वाहनांसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहितीही ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे यांनी दिली.

वाहतूकीत बदल पुढील प्रमाणे

प्रवेश बंद –  गुजरात महामार्गाने ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने येणा-या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

प्रवेश बंद –  मुंबई, वसई, विरार कडुन घोडबंदर रोडच्या दिशेने येणा-या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना फाउंटन हॉटेल जवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – गुजरात, मुंबई, विरार, वसई, कडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची जड अवजड वाहने ही चिंचोटी नाका येथून कामण अंजुरफाटा – माणकोली भिवंडी मार्ग इच्छित स्थळी जातील.

जड अवजड वाहने सोडून इतर वाहनांना आनंदनगर सिग्नल कटजवळ डावे बाजुस वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे विजय गार्डन सिग्नल किंवा वाघबीळ नाक्याजवळ, उजवीकडे वळण घेवून मुख्य रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल अशी माहिती डीसीपी दत्तात्रय कांबळे यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा