Home ठळक बातम्या मनसे आमदार राजू पाटील यांचे पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र ; नांदिवलीतील परिस्थितीचा...

मनसे आमदार राजू पाटील यांचे पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र ; नांदिवलीतील परिस्थितीचा घेतला आढावा

 

डोंबिवली दि.13 ऑक्टोबर :

कल्याण डोंबिवलीमधील केवळ रस्त्यांचीच नाही तर शहरांची जबाबदारीही तुमचीच असल्याचे सांगत मनसे आमदार राजू पाटील यांनी आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले आहे. अवघ्या काही मिनिटे झालेल्या पावसानंतर नांदीवली परिसर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टिका केली.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांची दुर्दशा झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नांदीवली परिसरात साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या परिसरात नाले नसल्याने नाल्यांतील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने आपण तीन पंप आपल्या आमदार फंडातून दिले होते. मात्र त्यामधील दोन पंप मनपा प्रशासनाने ताब्यात घेऊन एकच या परिसरात ठेवून धन्यता मानल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याच्या दिलेल्या इशाऱ्याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले की आता नागरिक रस्त्यावर उतरण्याआधी आपणच रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करू. दरम्यान इथल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही ते इकडे लक्ष देत नसल्याबाबत स्थानिक नागरिकांनीही यावेळी तीव्र शब्दांत यावेळी नाराजी व्यक्त केली.

यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मनसे अध्यक्ष विनोद पाटील, सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष रक्षित गायकर, संदीप म्हात्रे, ओम लोके यांसह परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा