Home ठळक बातम्या एनआरसी कामगारांच्या समस्यांबाबत शरद पवारांना भेटणार – जगन्नाथ शिंदे

एनआरसी कामगारांच्या समस्यांबाबत शरद पवारांना भेटणार – जगन्नाथ शिंदे

कल्याण दि.14 फेब्रुवारी :
कल्याणजवळील मोहने परिसरात असणाऱ्या आणि गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेल्या एनआरसी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या आपल्याला माहिती आहेत. त्यांच्या या समस्यांबाबत आपण पुढील आठवड्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी दिली आहे. एनआरसीचे कर्मचारी आंदोलनाला बसले असून जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेत आपला या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

गेल्या काही वर्षांपासून एनआरसी कर्मचाऱ्यांची जी काही वातहात झाली आहे, काही लोकांनी जो अन्याय त्यांच्यावर केला आहे. तो दूर करून न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपण स्वतः या आंदोलनाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत या आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवला.

तर एनआरसी कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्या आपल्याला माहिती आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढच्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेणार आहोत. त्यावेळी एनआरसी प्रतिनिधींनाही सोबत नेण्यात येणार असून त्यांनी आपले म्हणणे शरद पवार यांच्यासमोर मांडावे असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा