Home ठळक बातम्या कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीणमधील ३६० कोटींच्या रस्ते कामांना प्रत्यक्ष सुरूवात

कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीणमधील ३६० कोटींच्या रस्ते कामांना प्रत्यक्ष सुरूवात

कल्याण दि.२० डिसेंबर :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व परिसरातील विविध प्रभागांतील रस्त्यांच्या कामांना नुकतीच सुरूवात करण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक भूमीपूजन करून ही कामे सुरू झाली.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांना सुखकर प्रवास मिळावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून  कल्याण- डोंबिवली शहरातील रस्ते कामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व परिसरातील ११० कोटी ६० लाख रुपये खर्चातून होणाऱ्या ११ विविध रस्त्यांच्या कामांना रविवारी सुरूवात झाली. तसेच खोणी ते काटई नाका या मार्गिकेच्या कामाची सुरुवातही यावेळी करण्यात आली.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची रस्त्यांवरील खड्ड्यांपासून मुक्तता व्हावी आणि रस्त्यांचे नूतनीकरण तसेच काँक्रीटीकरण व्हावे यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरवठा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण- डोंबिवली शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले होते. सद्यस्थितीला या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून  कल्याण लोकसभा मतदारसंघातील  कल्याण ग्रामीण तसेच कल्याण पूर्व परिसरातील विविध प्रभागांतील ११०. ६० कोटी रुपयांच्या ११ प्रमुख रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये उंबार्ली पाईपलाईन ते उंबार्ली स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता नूतनीकरण, मानपाडा शिवमंदिर ते संदप उसरघर स्त्याचे काँक्रीटीकरण, क्रिस्टल प्लाझा ते गोदावरी बिल्डिंग रस्ता (कल्याण ईस्ट लोकग्राम), १०० फुटी रस्ता ते तिसाई मंदिर रास्ता , विजयनगर नाका ते आमराई (धर्मवीर आनंद फिघे साहेब चौक), नूतन विद्यामंदिर शाळा ते नाना पावशे चौक, शिवाजी कॉलोनी ते जुनी जनता बँक, कल्याण पूर्व चिंचपाडा कमान ते डी. एम.एम. शाळेपर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण, काटेमनावली नाका – हनुमान नगर – हरिभाऊ पाडा – साईबाबा नगर – कैलास नगर – म्हसोबा चौक – खडेगोलवली पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण,  विठ्ठलवाडी स्टेशन ते सूर्या शाळेपर्यंत च्या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जगदीश दूध डेअरीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण अशा ११ रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन यावेळी पार पडले. लवकरच या रस्त्यांचे काम पूर्ण होऊन हे रस्ते नागरिकांच्या सेवेत येतील अशी माहिती यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, असेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. याप्रसंगी महत्वांकाक्षी खाणी ते काटई नाका या मार्गिकेच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून या मार्गासाठी २० कोटी ४० लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. यातील एक मार्गिका यापूर्वीच प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे.

याप्रसंगी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक निलेश शिंदे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील, तालुका प्रमुख महेश पाटील, तालुका प्रमुख एकनाथ पाटील, गजानन पाटील, अमोल भोगले, सत्रपाल सिंग, हनुमंत ठोंबरे, माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, माजी नगरसेवक नवीन गवळी, सुभाष साळूंखे, विशाल पावशे, माजी नगरसेविका लाजवंती मढवी, माजी नगरसेविका माधुरी काळे, प्रशांत काळे, रवी पाटील, सुभाष साळुंखे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवासैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा