Home ठळक बातम्या “कोणत्याही परिस्थितीत धडक मोर्चा काढणारच”; पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत भाजपचा निर्धार

“कोणत्याही परिस्थितीत धडक मोर्चा काढणारच”; पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत भाजपचा निर्धार

 

कल्याण दि.28 जानेवारी :
भाजप नगरसेवकांवर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याच्या मुद्द्यावरून भाजपा चांगलीच आक्रमक झालेली दिसत असून कोणत्याही परिस्थितीत शनिवारी धडक मोर्चा काढणार असल्याचा निर्धार भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केला. मोर्चाच्या तयारीसंदर्भात कल्याण डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक गुरुवारी रात्री संपन्न झाली. (“In any case, there will be a protest”; BJP’s decision in the online meeting)

भाजपा नगरसेवक सचिन खेमा यांच्यावर राजकीय दबावाने गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावेळी खेमा हे घटनास्थळी हजर नव्हते. याला पोलीसही साक्षीदार असून राजकीय दबाव टाकून केवळ सूड भावनेने गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. तसेच त्यातूनच भाजप नगरसेवकांवर मोक्का लावण्याचे कारस्थान सुरू आहे. भारतीय जनता पार्टी प्रचंड ताकदीने रस्त्यावर उतरून याला विरोध करेल आणि ताकद दाखवून देईल. तर भाजपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आघाडी सरकार हे कारस्थान करत आहे. त्यांचा पोलीस प्रशासनात हस्तक्षेप होत असून त्याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जाब विचारण्यासाठी या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला परवानगी नाकारली तरीहीहा मोर्चा होणारच असा आक्रमक पवित्रा भाजपाने घेतल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

या बैठकीला 300 पेक्षा जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी इतर मंडळाचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा