Home ठळक बातम्या डोंबिवलीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; पाच वर्षांच्या मुलासह दोघे जखमी

डोंबिवलीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट ; पाच वर्षांच्या मुलासह दोघे जखमी

 

डोंबिवली दि.२४ ऑगस्ट :
डोंबिवली पश्चिमेच्या गायकवाड वाडी परिसरात इमारतीच्या तळमजल्यावरील घरात झालेल्या भीषण स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले. ज्यामध्ये पाच वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आजूबाजूच्या तीन घरांचेही नुकसान झाले आहे. घरगुती गॅसच्या गळतीमूळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.

डोंबिवली पश्चिमेला पारसनाथ को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या तळमजल्यावर मनिषा मोर्वेकर आपल्या पतीसह राहतात. काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या घरात हा भीषण स्फोट झाला. दुर्दैवाने नेमक्या त्याचवेळी उर्सुला या आपल्या पाच वर्षांच्या मुलगा रियांशसह घरी घेऊन येत होत्या. त्यावेळी मोर्वेकर यांच्या घरासमोरूनच जात असताना हा भीषण स्फोट झाला. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मोर्वेकर यांच्यासह आजूबाजूच्या तीन घरांचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे हा प्रकार झाला असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून मदत

दरम्यान या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याप्रकरणाची माहिती घेतली. तसेच माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांना रुग्णालयात पाठवून जखमींना सर्व ती मदत देण्याचे आश्वासन दिले. 

 

 

 

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा