Home ठळक बातम्या जीवनदिप कॉलेजने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनात चेतवले प्रगतीचे दिप – मुंबई ऊर्जा प्रोजेक्ट...

जीवनदिप कॉलेजने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनात चेतवले प्रगतीचे दिप – मुंबई ऊर्जा प्रोजेक्ट हेड सुरजित सिंग

 

गोवेली दि.२२ जून :
जीवनदिप महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रगतीचे दिप चेतवल्याचे गौरवोद्गार मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प प्रमुख सुरजित सिंग यांनी काढले. निमित्त होते ते गोवेली येथील जीवनदिप विद्यालयाच्या १९ व्या वर्धापन दिनाचे. सुरजित सिंग हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जीवन दिप विद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. कल्याण तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात या महाविद्यालयाने ज्ञानदानाचे पवित्र कार्य गेल्या दोन दशकांपासून अखंड सुरू ठेवले आहे. केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर इथल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही या महाविद्यालयाने मोठे योगदान दिल्याची कौतुकाची थाप सुरजित सिंग यांनी यावेळी दिली.

या वर्धापन दिन सोहळ्यात सुरजित सिंग यांच्या हस्ते गुणवान विद्यार्थी आणि विविध क्रीडा प्रकारात नावलौकिक मिळवणाऱ्या महाविद्यालयाच्या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा