Home ठळक बातम्या कल्याणात दुकानांना लागलेल्या आगीत अनेक पक्षी आणि मासे मृत्युमुखी

कल्याणात दुकानांना लागलेल्या आगीत अनेक पक्षी आणि मासे मृत्युमुखी

 

कल्याण दि.12 जानेवारी :
आजची सकाळ कल्याणकरांसाठी काहीशी हृदयद्रावक ठरली. कल्याण पश्चिमेच्या रामबाग परिसरात दुकानांना लागलेल्या आगीमध्ये अनेक पक्षी, प्राणी आणि माशांचा मृत्यू झाला. विविध पक्षी, प्राणी आणि माशांच्या विक्रीचीच ही दुकाने होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

कल्याण मुरबाड रोडवरून रामबाग परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर ही पक्षी, ससे आणि मासे विक्रीची गेल्या अनेक वर्षांपासून 3 दुकाने आहेत. या दुकानांमध्ये लव्हबर्डस, कबुतरे, ससे आणि माशांची विक्री केली जायची. आज सकाळी 8. 30 वाजण्याच्या सुमारास या दुकानाना आग लागल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल येईपर्यंत स्थानिकांनी आपल्या परीने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील अनेक पक्षी, ससे आणि माशांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला.

तर घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. आणि त्यातही काही पक्षी, ससे माशांना जीवदान दिले. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत ठोस कारण समजू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमूळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा