Home ठळक बातम्या अखंड हिंदू सेना आणि किन्नर अस्मिता संस्थेतर्फे जितेंद्र आव्हाडांचा निषेध

अखंड हिंदू सेना आणि किन्नर अस्मिता संस्थेतर्फे जितेंद्र आव्हाडांचा निषेध

पोलिसांत तक्रार देत केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

कल्याण दि.6 जानेवारी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील मेळाव्यात बोलताना प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे सर्वच स्तरांतून तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अखंड हिंदू सेना आणि तृतीयपंथीयांच्या किन्नर अस्मिता संस्थेतर्फेही कल्याणात जितेंद्र आव्हाडांचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पोलिसांना लेखी निवेदन देऊन जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती अखंड हिंदू सेनेचे अध्यक्ष दिपक कारंडे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी आपल्यासोबत अनेक तृतीयपंथीय समाजबांधवही उपस्थित असल्याचे सांगत आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दिपक कारंडे यांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा