Home बातम्या कल्याणच्या गायत्री विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे

कल्याणच्या गायत्री विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे

 

कल्याण दि.25 फेब्रुवारी :
कल्याण पूर्वेतील आदर्श महापौर पुरस्कार प्राप्त गायत्री विद्यालयाने आचार, विचार आणि संस्कार हे ब्रीद घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे केले. शाळेचे मुख्याध्यापक सतीश भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी गायत्री विद्यालय नेहमीच विविध कार्यक्रम राबवित असते. तर पालकांसाठीही शाळेतर्फे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. यंदा झालेल्या स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी बचपन आणि नवरस या थीमवर एकापेक्षा एक सरस नृत्य सादर केले होते. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक, दौडता बचपन, life is beautiful, children’s dream, अनाथ आश्रम, बालमजूर, कृष्णलिला, जोकर, लावणी, भय रस, शांत रस, शिव तांडव, साईबाबा यासारख्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या कार्यक्रमासाठी पालकांची, रसिकांची आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

तर यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10 वी मध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या अर्जुन कोंडीबा झोरे, प्राथमिक विद्यालयाचा आदर्श विद्यार्थी श्रेया संतोष गोळे आणि माध्यमिक विभागामधून जान्हवी भिकाजी दंडवते यांच्यासह सुमधुर आणि गोड आवाजात गाणी गाऊन युट्युबवर झळकलेली प्रगती शरद जाधव यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यालयातील निवृत्त शिक्षक मंगला गुंजाळ, यदुरा सावंत यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार पल्लवी राऊत, संचालक अभिजीत म्हात्रे तसेच समाजसेविका श्वेता पाटील, जि.प.सदस्य, शाम पाटील, विद्यालयाचे जेष्ठ स्नेही संजय फुलोरे, संजय सक्रे, आर. आर. पाटील, रोटरी क्लब कल्याणचे विजय भोसले, सुनील डाळिंबे, उद्योगपती नितीन राऊत, डावखर इन्सफ्रास्ट्रक्चरचे वैभव कोल्हे, पालक प्रतिनिधी जयवंत राऊत, ज्ञानेश्वर बंडगर तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक वर्ग उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा