Home ठळक बातम्या डोंबिवलीच्या ग्रंथोत्सवात ‘स्त्रीधन’ कार्यक्रमातून उलगडले जाणार शब्दांचे महात्म्य

डोंबिवलीच्या ग्रंथोत्सवात ‘स्त्रीधन’ कार्यक्रमातून उलगडले जाणार शब्दांचे महात्म्य

 

प्रसिद्ध निवेदिका दिपाली केळकर साधणार संवाद

डोंबिवली दि.11 फेब्रुवारी :
निरक्षर स्त्रियांनी साकारलेल्या ओव्या, म्हणी, वाक्यप्रचार आणि उखाणे यांच्या खुमासदार कथा आणि रंजक कवितांचा स्त्रीधन हा कार्यक्रम रविवारी १३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीकरांना अनुभवता येणार आहे. डोंबिवली पूर्वेतील के. बी.विरा शाळेच्या पटांगणात साहित्य यात्रा, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि शिवसेना शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ग्रंथोत्सवात रविवारी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम रंगणार आहे.

डोंबिवली पूर्वेतील के. बी. विरा शाळेच्या पटांगणात ४ फेब्रुवारीपासून आयोजित या ग्रंथोत्सवाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात मराठीतील ४० हुन अधिक प्रकाशकांची मराठी आणि हिंदी भाषेतील हजारो पुस्तके सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. या ग्रंथोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही प्रेक्षकांसाठी असणार आहेत.

यातील पहिला ‘स्त्रीधन’ हा कार्यक्रम रविवार १३ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ६ वाजता रंगणार आहे. प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका दीपाली केळकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. स्त्रीधन या कार्यक्रमात निरक्षर महिलांनी निर्मिलेल्या ओव्या, म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे यांचे महात्म्य त्या उलगडून सांगणार आहेत. तर महाराष्ट्रभर गाजलेला हा कार्यक्रम ग्रंथोत्सवाच्या निमिताने डोंबिवलीत अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा