Home ठळक बातम्या केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणूकीतील महिला आरक्षणाची सोडत 31 मे रोजी

केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणूकीतील महिला आरक्षणाची सोडत 31 मे रोजी

कल्याण- डोंबिवली दि. २३ मे :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी महिला आरक्षणाची सोडत 31 मे रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगातर्फे एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये आरक्षणाची सोडत काढणे, प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करणे, प्रभगनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी आणि अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम देण्यात आला आहे.

133 प्रभागाकरीता 44 प्रभाग आहेत. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 13 प्रभागांपैकी 4 महिलांसाठी तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या चार प्रभागापैकी 2 प्रभाग हे महिलांसाठी आक्षित आहेत. अनुसूचित जाती जमातीचे हे 17 प्रभाग सोडल्यास उर्वरीत 116 प्रभागांपैकी 58 प्रभाग हे सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यासाठी आरक्षणाची सोडत 31 मे रोजी होणार आहे.

 

आरक्षण सोडत आणि त्याच्याशी संबंधित असा असेल कार्यक्रम…

२७ मे २०२२- आरक्षित जागा निश्चित करण्याची सोडत काढण्याकरता जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे.

३१ मे २०२२ – आरक्षित जागा निश्चित करण्याकरता सोडत काढणे

१ जून २०२२ – सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे.

१ जून ते ६ जून २०२२ – प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी

१३ जून २०२२ – प्रभाग निहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा