Home ठळक बातम्या पवार साहेबांच्या माध्यमातून एक फोटोग्राफर आणि पक्षाचा गळा घोटला – मनसे आमदार...

पवार साहेबांच्या माध्यमातून एक फोटोग्राफर आणि पक्षाचा गळा घोटला – मनसे आमदार राजू पाटील

 

कल्याण दि.6 मे :
भाजपने व्यंगचित्र कलेचा गळा घोटला आहे, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंसह भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी टीका करताना सांगितले की, स्वत:चा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या पायाशी नेऊन ठेवला आहे. तेव्हा आम्ही असे बोलायचे का? की पवार साहेबांच्या माध्यमातून एका फोटोग्राफरचा आणि पक्षाचा गळा घोटला असा प्रश्न आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. कल्याण पूर्व भागातील हनुमान नगर परिसरातील जुनी कुष्ठरोग वसाहतीमध्ये समाज मंदीराचे आमदार पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .यावेळी पत्रकाराशी बोलताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

संजय राऊत यांना काही काम धंदे नाहीत, त्यांना एकांतात बडबड करायची सवय लावून घ्यायची आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. बहुधा ते त्याचीच प्रॅक्टिस करत असावेत असा टोलाही आमदार राजू पाटील यांनी यावेळी लगावला.

राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय येऊ नये अशा वलग्ना कुणी करू नये…

उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह  यांनी उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांवर मनसे कार्यकर्त्यानी  केलेल्या हल्ल्यांबद्दल व त्यांच्या अपमानाबाबत ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा जाहीर इशारा दिला होता .याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एखाद्या पक्षात असा कुठे न कुठे असतोच त्यांची मागणी हास्यास्पद आहे ,त्यांनी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संघापुढे केलेले भाषण ऐकावं ,त्यांनी कुणी तरी पुढे केलं असावं किंवा त्यांचं वैयक्तिक मत असेल ,राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय येऊ नये अशा वल्गना कुणी करू नये असा इशाराही त्यांनी दिला.

मनसे कार्यकर्ते अतिरेकी,गावगुंड आहेत का ? आमदार पाटील यांचा सवाल…

मनसेच्या कार्यकर्त्यावर जिल्हा बंदीची कारवाई करण्यात आली त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील संतापले .आमदार पाटील यांनी मनसे कार्यकर्ते पदाधिकारी हे काय अतिरेकी, गावगुंड आहेत का त्याना तुम्ही पकडता असा सवाल केला .पुढे बोलताना  या प्रकरणात पोलिसांना मी दोष देणार नाही. ते त्यांचे काम करीत आहेत. मात्र कुठे तरी लोकांना अडकवून विनाकारण हा बखेडा उभा केला जात आहे. यशवंत जाधव, पाटणकर यांचा मुद्दा मागे पडावा यासाठी सामाजिक मुद्याला सरकारच जातीय स्वरुप देत आहे. त्याचा परिमाण स्वरुप हा गोंधळ सुरु आहे. पाडव्याला राज ठाकरे यांची सभा झाली तेव्हाच सरकारने आदेश दिले असते तर आत्ता ही वेळ आली नसती. यूपीला भोंगे काढले. सर्व धर्माचे काढले. या सरकारला काय अडचण आहे असा प्रति प्रश्न पाटील यांनी उपस्थीत केला .

मागील लेखकल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची धडाकेबाज कारवाई : 10 सराईत गुन्हेगारांकडून 12 गुन्ह्यांची उकल
पुढील लेखमनसेच्या माजी नगरसेविकेसह १० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा