Home ठळक बातम्या 15 मिनिटांच्या अवकाळी पावसाने टिटवळ्यात दाणादाण; अनेक ठिकाणी झाडे पडली

15 मिनिटांच्या अवकाळी पावसाने टिटवळ्यात दाणादाण; अनेक ठिकाणी झाडे पडली

 

कल्याण दि.7 जानेवारी :
टिटवाळा परिसरात आज संध्याकाळी अवघे 15 मिनिटंच झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने चांगलीच दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या.

आज संध्याकाळी 5 सव्वा पाचच्या सुमारास टिटवाळा परिसरात अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस अशा दोघांनी मिळून अवघ्या काही मिनिटेच टिटवाळा आणि परिसराला झोडपून काढले. ज्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान-मोठे वृक्ष उन्मळून पडले. तर काही ठिकाणी ही झाडं पडल्याने काही ठिकाणी नुकसानही झाले. तर पावसाला सुरुवात होताच परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. तर कल्याण डोंबिवलीमध्ये पाऊस पडला नसला तरी संध्याकाळी काही वेळ ढगाळ वातावरण होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा