Home कोरोना आता कल्याण डोंबिवलीतही भरणार 1 ली ते 7 वीचे वर्ग; 16 डिसेंबरपासून...

आता कल्याण डोंबिवलीतही भरणार 1 ली ते 7 वीचे वर्ग; 16 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यास मान्यता

 

कल्याण – डोंबिवली दि.15 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली क्षेत्रातील 1ली ते 7 वीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. केडीएमसी प्रशासनाने याबाबतचे नवे आदेश काढत गुरुवार 16 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून 1 ली ते 7वीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे आणि अटी शर्थीचे पालन करून या शाळा सुरू करण्याचे निर्देश केडीएमसीने दिले आहेत.

राज्यातील इतर भागातील 1ली ते 7वीच्या शाळा या दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच 1 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. मात्र त्याचदरम्यान कोवीडचा नवा व्हेरियंट ओमीक्रॉनमूळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कल्याण डोंबिवलीतील शाळांचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. त्यातच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेली व्यक्ती ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आली. आणि केडीएमसीसह संपुर्ण राज्याच्या शासकीय यंत्रणेची झोप उडाली. मात्र सुदैवाने अवघ्या काही दिवसांतच हा रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतल्याने केडीएमसीने सुटकेचा निश्वास सोडला. तर ओमीक्रॉनचा रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 1 डिसेंबरपासून कल्याण डोंबिवलीतील 1ली ते 7 वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय केडीएमसीने पुढे ढकलला. आणि 15 डिसेंबरपर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

त्यानूसार या 2 आठवड्यात कल्याण डोंबिवलीत स्थिरावलेली कोवीड रुग्णांची संख्या आणि ओमीक्रॉनचा रुग्ण सापडूनही त्याचा फारसा न झालेला परिणाम विचारात घेता केडीएमसी प्रशासनानेही 1ली ते 7 वी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाळा सुरू करताना शासनाने आखून दिलेल्या अटी आणि शर्थीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

शाळा सुरू केल्यानंतर या नियमांचे करावे लागणार पालन

१) विद्यार्थ्याच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये

२) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा . जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी , दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी बसविणे,

सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर , कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविणे.

३) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी आणि विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत. तसेच कोवीडग्रस्त विद्यार्थ्याच्या शेजारील विद्यार्थ्यांचीही कारोना चाचणी करुन घेणे.

.शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे . उदा . वर्गाना अदला बदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ.

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे :

शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.

तापमापक ( Thermometer ). जंतूनाशक , साबण – पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता आणि निर्जतुकीकरण स्थानिक प्रशासनाने सुनिश्चित करावे. वापरण्यात
येणारे तापमापक हे calibrated contactless infrared digital thermometer असावे.

ज्या ठिकाणी वाहतूक सुविधेचा वापर करण्यात येणार आहे अशा शाळांनी मुख्याध्यापकांच्या नियंत्रणाखाली वाहतुक आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरीता वाहनांचे वेळो – वेळी निजंतुकीकरण करावे.

एखाद्या शाळेत विलगीकरण केंद्र ( क्वारंटाईन सेंटर ) / कोविड सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थलांतरीत करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जतुकीकरण करुन हस्तांतर शाळेकडे करावे

शिक्षकांची कोविड १९ बाबतची चाचणी :
• संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कोविड- १९ साठीची ४८ तासापूर्वीची RTPCR चाचणी करावी .

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. या प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी.

ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल positive असतील त्यांनी कोविड मुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे.

शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचाऱ्यांना
रजेवर राहण्याची परवानगी द्यावी.

• ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल negative आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना
कोविड- १९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड -१९ बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरीत चाचणी करावी. शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा / कार्यालयामध्ये प्रवेश द्यावा.

3. बैठक व्यवस्था :
वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर ( Physical Distancing ) च्या नियमानुसार असावी.

वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.

बैठक व्यवस्थेमध्ये दोन विद्यार्थ्या दरम्यान 6 फुटांचे अंतर असावे .

100 % उपस्थितीबाबत देण्यात येणारी पारितोषिके कोविड 1 9 परिस्थितीमुळे सद्य : परिस्थितीत देऊ नये. भविष्यामध्ये कोविड परिस्थिती सुधारल्यानंतर नियमित शाळा सुरु झाल्यानंतर अशी पारितोषिके देता येतील.

९ . शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण करणे आवश्यक:-
शाळा सुरु करण्यापूर्वी त्या शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

शाळेतीत्न कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणिबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे.

१. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परीस्थिती सतत राखणे :

शाळेचा परीसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा,
शाळेतील वर्गखोल्या व वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठभाग जसे स्वच्छतागृहे हॅण्डल, अध्ययन अध्यापन साहित्य , डेस्क , टॅबलेट्स , खुर्व्या . वाहने इ . वारंवार स्वच्छता व निर्जतुकीकरण करण्यात यावे.

शाळेतील व शाळेच्या परीसरातील सर्व कचन्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्यात यावी

सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात यावी.

विद्यार्थ्यांनी सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करावे.

सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी शाळेत येताना व शाळेत असेपर्यंत तसेच, शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर करावा. तसेच विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

शक्य असल्यास वैद्यकीय मदत कक्ष ( Health Clinic ) सुरु करावे . शक्य असल्यास यासाठी इच्छुक
डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. विद्यार्थ्यांचे दररोज तापमान तपासणी करावी.

हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण . हॅन्डवॉश व स्वच्छ पाण्याची
व्यवस्था करण्यात यावी. सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सनिटायझर ठेवण्यात यावे.

शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळा व वर्ग खोल्यांचे नियमितपणे निर्जतुकीकरण करण्यात यावे.

वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये.

२. शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे :-
• जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात.

• काही विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास ते त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणावे

कोविड १९ चा प्रसार टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पध्दत टाळण्यात या 4/7 शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांची संख्या लक्षात घेऊन मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी.

शाळेत जलतरण तलावाचा वापर करण्यात येऊ नये.

३. प्रत्येक शाळेमध्ये वैद्यकीय मदत कक्ष ( llealth Clinic ) सुरु करणे :

सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात .

हेल्थ क्लिनीकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व परिचारीकांची मदत घ्यावी.

विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाची दररोज Thermal Screening चाचणी घेण्यात यावी.

ताप , सर्दी , जोरात श्वासोच्छवास करणारे , शारिरावर ओरखाडे , डोळे लाल झालेले ओठ फुटलेले, लाल झालेले, बोट . हात आणि साधे सुजलले . उलटया जुलाब, पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा .

११. विद्यार्थ्यावरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे-

अ) खालील लक्षणे दर्शविणान्या विद्याथ्यांवर शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी.

जास्त विचट करणारे रागीट व छोटयाश्या गोष्टीत निराश होणारे.
वर्गात नहमी शांत बसणार व कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे.

वयाशी विसंगत वर्तणूक दर्शवणारे उदा. अंगठा चोखणे इ.
खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शविणारे, शालेय शिक्षणात असामान्य घट दर्शविणारे असहाय्य झालेले, सतत रडणारे विद्यार्थी. अशी लक्षणे असणान्या विद्याध्यांची विशेष काळजी घ्यावी आणि त्याच्याशी संवाद साधावा विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करावे.

१२. विद्यार्थी , शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये काविड-19 सदृश्य लक्षणे निर्माण झाल्यास किंवा शाळेतीन कोणाला कोविड- 19 सदृश्य लक्षणे दिसू लागल्यास घाबरुन न जाता अशा व्यक्तीला भेदभावाने वागविण्यात येऊ नये.

पालक आणि वैद्यकीय सुविधा केंद्रास कल्पना द्यावी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होई पर्यंत किंवा पालक येईपर्यंत अशा विद्यार्थ्याला मास्कसह शाळेतील वेगळया खोलीत ठेवावे.

कोविड बाधित विद्यार्थी वर्गामध्ये आढळल्यास पुढील प्रमाणे कृती योजना करण्यात यावी.

तो विद्यार्थी वर्गामध्ये ज्या रांगेत बसतो त्यांच्या मागील , पुढील आणि दोन्ही बाजच्या 3 रांगेतील विद्याथ्यांना निकट सहवासित मानावं,

याशिवाय इतर कारणामुळे बाधित विद्याथ्यांच्या निकट संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची / शिक्षकांची यादी करावी

अशा निकट सहवासित विद्यार्थ्यांना होम क्वारंटाईन करावे. या काळात ज्यांना कोविडसारखी लक्षणे आढळतील त्यांची कोविड चाचणी करुन घ्यावी.

• ज्यांच्यामध्ये कोविड लक्षणे दिसून येत नाही अशा विद्यार्थ्यांनी 5-10 दिवसांनंतर कोविड चाचणी करुन घ्यावी.

ज्या वर्गात विद्यार्थी कोविड बाधित आढळून आले त्या वर्गातील बाके सोडियम हायड्रोक्लोराईट द्रावणाने निर्जतुकीकरण करण्यात यावी. तसेच स्वच्छतागृहे , सामायिक जागा यांचे निर्जतुकीकरण करुन घ्यावे.

शाळेत काही शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना कोवीडसारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोणी कोविड बाधित आढळल्यास शाळेत आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी शाळा मुख्याध्यापक व प्रशासनाने घ्यावी.

१३. विद्यार्थ्याच्या मनोसामाजिक स्वास्थ्यबाबत शिक्षकांना मार्गदर्शन

पहिल्या आठवडयामध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यास शाळेची सवय होवू द्यावी. त्यासाठी आनंददायी शिक्षणांवर भर द्यावा. ज्यामुळे मुलांना शाळेची गोडी निर्माण होईल.

प्रत्येक विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी अवगत करुन त्यानुसार विद्यार्थ्यांशी परस्परसंवाद साधावा.

कोविड होवून गेलेल्या विद्याथ्यांशो सहानुभूतीने वागणे.
विद्यार्थी व पालकांशी ऑनलाईन ऑफलाईन पध्दतीने संपर्कात राहणे
/
१४. शिक्षक पालक बैठकीत चर्चा :
कोविड आजाराबाबत माहिती व सदर आजार टाळण्याबाबत पालकांना माहिती द्यावी.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा