Home कोरोना कोरोना वाढता प्रादुर्भाव; विनामास्क फिरणाऱ्या 357 जणांकडून पावणे दोन लाखांचा दंड वसूल

कोरोना वाढता प्रादुर्भाव; विनामास्क फिरणाऱ्या 357 जणांकडून पावणे दोन लाखांचा दंड वसूल

 

कल्याण/डोंबिवली दि.22 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केडीएमसीनेही कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवरील कारवाई आणखी तीव्र केली आहे. गेल्या 3 दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या 357 जणांकडून महापालिकेने 1 लाख 78 हजारांचा दंड वसूल केला आहे. (Covid, corona, kdmc, no mask no entry)

गेल्या शुक्रवार, शनिवारआणि रविवार असे 3 दिवस महापालिकेने ही कारवाई केली.
एकीकडे कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. त्यातच सध्‍याचा काळ हा लग्न सराईचा असल्यामुळे, बाहेर विशेषत: गर्दीच्या ठिकाणी किंवा कुठल्याही समारंभात वावरतांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन तसेच मास्क अथवा तोंडाला रुमाल बांधणे बंधनकारक आहे. तर सार्वजनिक ठिकाणी वावरतांना अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करण्यासह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचे आवाहनवजा इशारा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा