Home ठळक बातम्या कल्याण आणि आसपासच्या परिसरात दाट धुक्याची चादर

कल्याण आणि आसपासच्या परिसरात दाट धुक्याची चादर

मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांची आजची सकाळ झाली स्पेशल

कल्याण दि.25 ऑगस्ट :
एकीकडे शिवसेना आणि भाजपमधील राजकीय धुराळ्यामूळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आजची सकाळ आरोग्यासाठी फिरायला बाहेर पडणाऱ्या कल्याणातील नागरिकांसाठी रोजच्यापेक्षा काहीशी स्पेशल अशी ठरली. कल्याण आणि आसपासच्या ग्रामीण भाग आज सकाळी दाट धुक्यात हरवून गेलेला पाहायला मिळाला.
कल्याणातील हे धुके इतके दाट होते की एका इमारतीवरून दुसरी इमारतही दिसत नव्हती. कल्याणातील बहुतांश टोलेजंग इमारती या धुक्यात हरवून गेल्याचे दिसून आले. तर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पाडणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरही या धुक्यामुळे एक वेगळाच आनंद दिसत होता.

मागील लेख“यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर”; कार्यालयावरील हल्ल्यानंतर भाजपचा इशारा
पुढील लेखकालच्या राड्यानंतर शिवसेना-भाजपकडून आपापल्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांचा सत्कार

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा