Home ठळक बातम्या ‘अनधिकृत बांधकामांवरील कारवाई म्हणजे टार्गेट देण्यासाठीचा खेळ’ – आमदार राजू पाटील यांचा...

‘अनधिकृत बांधकामांवरील कारवाई म्हणजे टार्गेट देण्यासाठीचा खेळ’ – आमदार राजू पाटील यांचा गंभीर आरोप

 

डोंबिवली दि.17 डिसेंबर :
अनधिकृत बांधकामांना समर्थन देण्याचा कोणताही प्रश्न नसून केडीएमसी आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांबाबत घेतलेली भूमिका चांगली असली तरी हा टार्गेट देण्यासाठीचा खेळ आहे का? असा गंभीर आरोप कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

अनधिकृत बांधकामे थांबणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनाचेही तेवढेच लक्ष असले पाहीजे, ही बांधकामे वाढलीच का? गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय राजवट असल्याने त्यांनी आधी स्वतःचे ऑडिट करणे आवश्यक आहे. प्रशासकीय राजवटीत किती अनधिकृत बांधकामे वाढली? किती अधिकाऱ्यांवर आपण कारवाई केली? किती बिल्डरांवर गुन्हे दाखल करत या अनधिकृत बांधकामांना जबाबदार व्यक्तींवरही कारवाईची मागणी आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

तर 3 महिन्यात 20 हजार अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी तेवढे मनुष्यबळ यंत्रणा केडीएमसीकडे आहे का? की निवडणुका आल्या असून संबंधितांना घाबरवून टार्गेट तर देण्यात आले नाहीये ना? 3 महिन्यात 20 हजार बांधकामे तोडणे शक्य आहे का? असे मुद्दे उपस्थित करून अनधिकृत बांधकामप्रमाणे इतर बाबींकडेही एवढ्याच आत्मीयतेने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मतही आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यानंतर आता मनसे आमदार राजू पाटील यांनीही केडीएमसी आयुक्तांच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्याची उत्तरं येत्या काळातच मिळतील अशी अपेक्षा आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 17 रुग्ण तर 13 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 18 डिसेंबर रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा