Home क्राइम वॉच सर्व्हेची प्रत देण्यासाठी 1 लाख 80 हजारांची लाच घेणाऱ्या दोघा सर्व्हेयरना अँटी...

सर्व्हेची प्रत देण्यासाठी 1 लाख 80 हजारांची लाच घेणाऱ्या दोघा सर्व्हेयरना अँटी करप्शनने पकडले

कल्याण दि.16 एप्रिल :
जमिनीच्या सर्व्हेची प्रत देण्यासाठी पावणे दोन लाखांची लाच घेणाऱ्या कल्याणातील टीएलआर (भूमी अभिलेख कार्यालय) कार्यालयातील दोघा सर्व्हेयरना ठाणे अँटी करप्शन विभागाने आज रंगेहात पकडले. भूषण गिरासे आणि चंद्रशेखर अहिरराव अशी या दोघा सर्व्हेयरची नावे आहेत. (Thane Anti-corruption arrests two surveyors for accepting bribe of Rs 1 lakh 80 thousand)।

कल्याण तालुक्यातील एका शेतकऱ्याने त्यांच्या जमिनीचे कल्याण भूमी अभिलेख कार्यालयातर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाची प्रत देण्यासाठी संबंधित सर्व्हेयरनी शेतकऱ्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत संबंधित शेतकऱ्याने ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली. त्याच्याआधारे आज दुपारी लाचेची 1 लाख 80 हजारांची रक्कम स्विकारताना ठाणे अँटी करप्शन विभागाने या दोघा सर्व्हेयरला रंगेहात पकडले.
दरम्यान एकीकडे सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाही सरकारी कार्यालयातील खाबूगिरी अद्यापही थांबलेली नसल्याचेच या प्रकरावरून सिद्ध झाले.

मागील लेखमुंबई-ठाण्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीतील चष्मा दुकानांचा समावेशही अत्यावश्यक सेवेत करा – चष्मा व्यापाऱ्यांची मागणी
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार437 रुग्ण तर 1 हजार 304 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा