Home ठळक बातम्या वाहतुक सुरक्षेचे धडे देण्यासाठी कल्याणच्या रस्त्यावर अवतरले ‘बालगणेश’

वाहतुक सुरक्षेचे धडे देण्यासाठी कल्याणच्या रस्त्यावर अवतरले ‘बालगणेश’

कल्याण दि.16 फेब्रुवारी :
शहरातील बेशिस्त वाहन चालकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली असून अशा बेशिस्त चालकांना वाहतुकीचे धडे शिकवण्यासाठी कल्याणात बालगणेश अवतरलेले पाहायला मिळाले. तर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या नागरिकांना या बालगणेशाने गुलाबाची फुलं देत नियम पाळण्यास सांगितले.

बेशिस्त वाहन चालक ही सध्या सर्वच प्रमूख शहरांची मोठी डोकेदुखी बनली आहे. वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनीच योग्यरितीने पालन केल्यास अपघातातील बळींचे प्रमाण कमी होण्यासह वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासही मोठी मदत होणार आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना अजिबात दिसत नसून उलट वाहतुकीचे नियम मोडण्याकडे लोकांचा कल अधिक वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाअंतर्गत वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. कल्याण स्टेशन परिसरात झालेल्या या उपक्रमात बाल गणेशाच्या वेशात लहान मुलांनी वाहन चालकांना सुरक्षा नियमांचे महत्व पटवून दिले. तर विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वाराना, विनामास्क गाडी चालवणाऱ्या रिक्षाचालकांना, बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब पुष्प देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा