Home ठळक बातम्या नटबोल्ट विना धावली एसटी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला; कल्याण-शिळ मार्गावरील घटना

नटबोल्ट विना धावली एसटी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला; कल्याण-शिळ मार्गावरील घटना

कल्याण दि.16 फेब्रुवारी : कल्याण-शीळ मार्गावर चक्क मागील चाकाच्या नटबोल्टविनाच एसटी बस धावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या बसच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

पनवेल एसटी डेपोमधून सोमवारी कल्याण डेपोध्ये आलेली ही एसटी आज सकाळी पुन्हा प्रवासी घेऊन पनवेलच्या दिशेने रवाना झाली. कल्याण-शीळ रोडवर मानपाडा परिसरात ही एसटी बस आल्यानंतर चाकात काहीतरी गडबड असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामूळे त्याने बस थांबवून मागील चाकं तपासली असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. बसच्या मागील डाव्या चाकाचे नट बोल्टच निखळून पडल्याचे त्याला आढळले. हा प्रकार लक्षात येताच त्याने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवत कल्याण बसडेपोला याबाबत माहिती दिली. चालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली असली तरी एसटी महामंडळाकडून बसेसच्या केल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मागील लेखमाघी गणेशोत्सवानिमित कल्याणच्या महालक्ष्मी मंदिरात द्राक्षांची आकर्षक सजावट
पुढील लेखवाहतुक सुरक्षेचे धडे देण्यासाठी कल्याणच्या रस्त्यावर अवतरले ‘बालगणेश’

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा