Home Uncategorised कत्तलखान्याच्या नूतनीकरणाला निधी, मात्र वेद पाठशाळेचा सरकारला विसर – भाजप आमदार रविंद्र...

कत्तलखान्याच्या नूतनीकरणाला निधी, मात्र वेद पाठशाळेचा सरकारला विसर – भाजप आमदार रविंद्र चव्हाणांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

 

डोंबिवली दि.7 सप्टेंबर :
एकीकडे राज्यात कत्तलखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून पैसे दिले जतात. मात्र डोंबिवलीतील आपल्या मतदारसंघात वेद पाठशाळेचा निधी मंजूर होऊनही पैसे दिले जात नसल्याचे सांगत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. 472 कोटींचे डीपीआर मंजूर झालेले रस्ते, कचरा कर, मेट्रो, ग्रोथ सेंटर पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी आदी मुद्द्यांवरून आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ‘डोंबिवलीकरांच्या व्यथांच्या’ माध्यमातून सडकून टिका केलेली पाहायला मिळाले.

एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचे असे आपण करणार नाही. मात्र आपणही गाय वासरू मारणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू नका. डोंबिवली शहराशी आपले वेगळे नाते आहे. या नात्यासाठी आम्ही आपला आदर करत असून डीपीआर तयार असणारे 472 कोटी रुपये साईड लाईनला गेले आहेत. मुख्यमंत्री साहेब आपण शिंदे साहेबांना सांगितले पाहीजे की डोंबिवली शहरावर प्रेम करा आणि ते पैसे आम्हाला पुन्हा द्या असे सांगत आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेला चिमटा काढला. तर कल्याण शिळ रोडवर सुरू असणाऱ्या सहा पदरीकरणाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना आमदार चव्हाण यांनी या कामाची तुलना थेट ग्रामपंचायत स्तरावर तुकड्या तुकड्यात चालणाऱ्या कामाशी केली.

तर पालघर निवडणुकीचा दाखला देत आमदार रविंद्र चव्हाण यांनी राज्यात सत्ता असताना आम्ही युतीच्या कार्यकर्त्यांवर कधीच अन्याय केला नसल्याचे सांगितले. मात्र इथले डीसीपी कशा पद्धतीने अन्याय करतात, त्याचा जाब कोणी तरी विचारला पाहीजे. का केलं।कशासाठी केलं? कोणी सांगितले म्हणून केले. आमच्यामध्ये वैर नसून अशाप्रकारचे बाबू अधिकारी अशा पद्धतीने वागतात त्यामूळे सर्व होत असल्याचे आमदार चव्हाण म्हणाले. विकास कामांसाठी आम्हाला पैसे हवेत, पूर्वीचे पैसे मिळाले पाहिजेत, ग्रोथ सेंटर उभे राहिले पाहिजे, मेट्रो धावली पाहिजे. हे सर्व आपण राजकीय वक्तव्य म्हणून नव्हे तर लोकांची व्यथा मांडत आहोत. तर काळा तलावाचे भगवा तलाव करताना आम्हीही झटलो. मात्र आम्ही झटलो ती आमची, आमच्या सर्व कार्यकर्त्यांची चूक होती का? असा उद्विग्न सवालही आमदार चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा