Home ठळक बातम्या ऍनिमियाग्रस्त महिलांच्या उपचारासाठी ‘आयएमए’ कल्याणचा पुढाकार

ऍनिमियाग्रस्त महिलांच्या उपचारासाठी ‘आयएमए’ कल्याणचा पुढाकार

कल्याण दि.9 मार्च :
आपल्या समाजोपयोगी कार्यातून नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणने यंदाच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या प्रमूख उपस्थितीत कल्याणातील आयएमए हॉलमध्ये हा छोटेखानी सोहळा संपन्न झाला. तसेच या सोहळ्यात कोवीड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विविध महिलांचाही गौरव करण्यात आला.

भारतातील स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने ऍनिमिया हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. हा आजार दूर करून स्वतःच्या आरोग्याबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘माय हिमोग्लोबिन डायरी’ हा पथदर्शी उपक्रम सुरू केला. त्यासाठी आयएमए कल्याणने ऍनिमिया आजार असणाऱ्या 25 गरजू महिलांची निवड करत त्यांच्यावरील संपूर्ण उपचाराचा खर्च उचलला आहे. पुढील 3 महिने या महिलांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यक पातळीवर पोहचत नाही तोपर्यंत तज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले जाणार असल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. त्याचबरोबर महिला डॉक्टरांसाठी ‘हाल ए दिल’ नावाचा उपक्रमही आयएमए कल्याण राबवत असून त्याद्वारे हृदयरोग तज्ञांमार्फत या महिला डॉक्टरांची संपूर्ण तपासणी केली जाणार आहे.

तर कोवीड काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या कार्यक्रमात कल्याण डोंबिवलीच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली, डॉ. सुहासिनी बडेकर, डॉ. प्रज्ञा टिके, फोर्टीस हॉस्पिटलच्या प्रमूख डॉ. सुप्रिया अमेय यांच्यासह अनेक खासगी डॉक्टरांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सेक्रेटरी डॉ. ईशा पानसरे, डॉ. सुरेखा इटकर, डॉ. सोनाली पाटील, डॉ. विशाखा परळीकर, डॉ. प्रियांका धर्माधिकारी यांच्यासह अनेक महिला डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा