Home ठळक बातम्या कल्याण – शिळ रस्त्याच्या कामाची आमदार राजू पाटील यांच्याकडून पाहणी

कल्याण – शिळ रस्त्याच्या कामाची आमदार राजू पाटील यांच्याकडून पाहणी

 

एमएसआरडीसी अधिकारीही उपस्थित

डोंबिवली दि.5 ऑगस्ट :
कल्याण – शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी पलावा ते सुयोग हॉटेल चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

कल्याण – शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. पलावा ते सुयोग हॉटेल चौकापर्यंतच्या मार्गावर 3 महत्वाचे जंक्शन्स आहेत. कुशाला हॉटेल, मानपाडा चौक आणि सुयोग हॉटेल या तिन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीला कारणीभूत असणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याच्या सूचना आपण यावेळी एमएसआरडीसी अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना केल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तर एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कोणत्या सालातील आहेत? नुसत्या मंजुऱ्या येतात, होर्डिंग्ज लागतात. मात्र त्यांची कामे कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित करत आम्ही मंजूर केलेले रस्तेही आपल्या नावावर खपवत असल्याचा गौप्यस्फोटही आमदार राजू पाटील यांनी यावेळी केला.
दरम्यान या रस्त्याच्या कामाबाबत कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी सांगितले की रस्त्याच्या कामात राहून गेलेल्या त्रुटी असतील त्या लवकरच दूर केल्या जातील.

मागील लेखवेळ वाढवून द्या अन्यथा आम्हीही हॉटेल्स बंद ठेऊ – कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांचा इशारा
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 82 रुग्ण तर 105 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा