Home ठळक बातम्या मनसे सहकार सेनेतर्फे कल्याणात हौसिंग सोसायटीबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मनसे सहकार सेनेतर्फे कल्याणात हौसिंग सोसायटीबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

कल्याण दि.30 सप्टेंबर :
हौसिंग सोसायटीच्या ( गृहनिर्माण संस्था) कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार सेनेतर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी 3 ऑक्टोबर रोजी कल्याण पश्चिमेच्या सिद्धिविनायक हॉल, बिर्ला कॉलेज रोड येथे हे शिबीर होणार असल्याची माहिती मनसे सहकार सेनेचे उपशहराध्यक्ष नितेश गायकवाड यांनी दिली.
या मार्गदर्शन शिबिरात गृहनिर्माण संस्थेचे डीम्ड कन्व्हेयन्स (मानवी अभी हस्तांतरण), लेखा परीक्षण, व्यवस्थापन आदी विषयांवर सखोल माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे या शिबिराला गृहनिर्माण संस्थांच्या अधिकाधिक पदाधिकारी-सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर संघटक प्रविण कदम आणि उपशहराध्यक्ष नितेश गायकवाड यांनी केले आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :-7506082151

मागील लेखकेडीएमसीचा 38 वा वर्धापन दिन : नियोजनशून्य आणि दिशाहीन कारभाराची ‘प्रतिमा’ बदलण्याचे मोठे आव्हान
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 68 रुग्ण तर 58 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा