Home ठळक बातम्या उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात सामाजिक संस्थेचे नदीपात्रात आंदोलन

उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात सामाजिक संस्थेचे नदीपात्रात आंदोलन

कल्याण दि.10 फेब्रुवारी :
कल्याणसह प्रमूख शहरांना पाणी पुरवठा होणाऱ्या उल्हास नदीतील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या नदीपात्रातील प्रदूषणाबाबत वारंवार मागणी करूनही शासकीय स्तरावर कोणतीच दखल न घेतल्याने कल्याणातील ‘मी कल्याणकर’ सामाजिक संस्थेतर्फे नदीपात्रात धरणे आंदोलन सुरू झाले आहे. कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक नितीन निकम यांनी पुन्हा एकदा या प्रश्नावर थेट नदीपात्रातच आंदोलन पुकारले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उल्हास नदीपात्राला जलपर्णीनी संपूर्ण वेढा घातला आहे. त्यामुळे नदीपात्र आणि नदीतील पाणी या जलपर्णीनी झाकून गेले आहे. ही जलपर्णी सांडपाणी आणि घाणेरड्या पाण्यावर पोसली आणि वाढली जाते. याचाच अर्थ उल्हास नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेली ही जलपर्णी नदीतील प्रदूषित पाण्याचीच साक्ष देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या नदीमध्ये उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नाल्यांमधून कोणतेही प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जाते. त्यावर दोन्ही महापालिकांनी तातडीने उपाय योजना करणे आणि नदीपात्रात पसरलेली ही सर्व जलपर्णी तातडीने काढून टाकण्याच्या मागणीसाठी आपण हे आंदोलन करीत असल्याचे नितीन निकम यांनी सांगितले. 2016 मध्येही याच मुद्द्यावर निकम यांनी आंदोलन छेडले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा