Home ठळक बातम्या एमएस धोनी आपला रोल मॉडेल – कल्याणकर क्रिकेटर तुषार देशपांडे

एमएस धोनी आपला रोल मॉडेल – कल्याणकर क्रिकेटर तुषार देशपांडे

के.सी.गांधी शाळेकडून हृद्य सन्मान सोहळा

कल्याण दि.15 सप्टेंबर :
एमएसडी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा केवळ एक चांगला खेळाडूच नसून एक चांगली व्यक्तीही असून खऱ्या अर्थाने तो आपला रोल मॉडेल असल्याची भावना सुप्रसिद्ध क्रिकेटर तुषार देशपांडेने व्यक्त केली. के.सी. गांधी शाळेचा माजी विद्यार्थी असलेल्या तुषारचा त्याच्या यशाबद्दल शाळेतर्फे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. आपल्या शाळेकडून झालेले हे कौतुक आणि प्रेम पाहून तुषार चांगलाच भावनिक झाला होता.

मोठी स्वप्न बघितली पाहिजेत…
झारखंडसारख्या अतिशय ग्रामीण भागातून आलेल्या एमएस धोनीने त्याच्या कारकीर्दीत देशाला वर्ल्ड कपसह अनेक सोनेरी क्षण प्राप्त करून दिले आहेत. आपण गेल्या 3 वर्षांपासून त्याच्यासोबत खेळत असून माझ्यासारख्या अनेक नवोदित खेळाडूंना त्याच्याकडून भरपूर प्रोत्साहन मिळत असल्याचेही तुषारने यावेळी सांगितले. तर यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुषारने सांगितले की कोणतेही करिअर हे चुकीचे किंवा बरोबर नसते. जे काही आहे त्यात आपले 100 टक्के योगदान द्या. तुम्ही मोठी स्वप्न बघितली पाहिजेत कारण स्वप्न नक्कीच सत्यात उतरतात असा सल्ला त्याने विद्यार्थ्यांना दिला.

तर तुषारने क्रिकेटमध्ये जो नावलौकिक मिळवला आहे तो अद्यापपर्यंत कल्याणातील कोणत्याही खेळाडूला प्राप्त करता आलेला नाही. ही केवळ त्याच्याच नव्हे तर संपूर्ण कल्याणसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार के.सी. गांधी शाळेच्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्रा. अशोक प्रधान यांनी यावेळी काढले.

या कार्यक्रमाला बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य अविनाश पाटील, ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितूले, के.सी.गांधी संस्थेचे सचिव मनोहर पालन, ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी, हेमंत जोशी, तूषारचे वडील अभय देशपांडे, जायंटस् क्लबचे किशोर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
तर कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तूषारच्या नावाचा जयघोष सुरूच होता.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा