Home ठळक बातम्या कल्याण पूर्व आणि उल्हासनगरचा वीजपुरवठा सोमवारी काही काळ राहणार बंद

कल्याण पूर्व आणि उल्हासनगरचा वीजपुरवठा सोमवारी काही काळ राहणार बंद

 

टाटा पॉवर उपकेंद्रात होणार तातडीचे दुरुस्ती काम

कल्याण दि. 24 ऑक्टोबर :
नेतीवली येथील 132 केव्ही टाटा पॉवर उपकेंद्रात अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या उच्चदाब उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग एक आणि उल्हासनगर तीन उपविभागातील काही भागांचा वीजपुरवठा सोमवारी (25 ऑक्टोबर) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार असून या भागातील वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कल्याण पूर्वेतील या भागात वीज पुरवठा बंद राहणार…

कल्याण पूर्व एक उपविभागातील 22 केव्ही क्षमतेचे चिंचपाडा, जरीमारी आणि जाईबाई या तीन फिडरअंतर्गत जरीमारीनगर, तिसगाव, चिंचपाडा, काटेमानवली, हनुमाननगर, एसटी डेपो, विठ्ठलवाडी, खाडेगोलवली आणि कैलासनगर भागाचा वीजपुरवठा बंद राहील.

उल्हासनगरमधील या भागात वीज पुरवठा नाही…

तर उल्हासनगर तीन उप विभागातील चोपडा कोर्ट, अमन टॉकीज, महापालिका परिसर, सपाह गार्डन, शिवाजीनगर, ममतानगर, सचदेवनगर, गौतमनगर, प्रबुद्धनगर, हिराघाट, पवई चौक, विठ्ठलवाडी स्टेशन परिसर, सिंधू युथ सर्कल, उद्योगनगर, उल्हासनगर स्टेशन परिसर, सेक्शन 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 24, शिवाजी चौक, खन्ना कंपाऊंड भागातील वीजपुरवठा बंद राहील. ओटी सेक्शन, अशोकनगर, आनंदनगर, संतोषनगर, दसरा मैदान, धर्मदास दरबार आणि वडलगाव भागाचा वीजपुरवठाही बाधित होणार आहे.

परंतु ओटी सेक्शन ते वडलगाव या भागांना पर्यायी मार्गाने वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगत खंडित वीज पुरवठ्याबाबत ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पूर्वकल्पना देण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (25 ऑक्टोबर) याठिकाणी कोवीड लसीकरण
पुढील लेखकोयना एक्सप्रेस पकडण्यासाठी होणारी कल्याणातील प्रवाशांची धावपळ अखेर थांबली

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा