Home ठळक बातम्या कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

कल्याण दि. 3 फेब्रुवारी :
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निर्देसानुसार कल्याण तालुक्यातील 41 ग्राम पंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत जाहीर झाली.
गेल्या महिन्यात 15 तारखेला 41 पैकी 20 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. तर 18 जानेवारीला त्याची मतमोजणी पार पडली होती. आज झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमाती 3,नागरिकांचा मागास प्रवर्ग 11 जागा आणि स्त्रियांकरता एकूण जागांपैकी 12 जागा राखीव अशा पद्धतीने आरक्षण काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार दिपक आकडे यांनी दिली.

कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे….

मागील लेखकल्याणात आढळला रंग बदलण्यात माहीर असा दुर्मिळ ‘शॅमेलीऑन’
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 82 रुग्ण तर 64 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा