Home कोरोना केडीएमसी क्षेत्रात सुसज्ज ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करा – राजेश मोरे यांची मागणी

केडीएमसी क्षेत्रात सुसज्ज ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करा – राजेश मोरे यांची मागणी

डोंबिवली दि.7 मे :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या कोवीड रुग्णालयाना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. एकीकडे देशातील तज्ञ डॉक्टरांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला असून या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने सुसज्ज ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याची मागणी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केली आहे. यासंदर्भात मोरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवले असून त्याद्वारे ही मागणी केली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये असणाऱ्या कोवीड रुग्णालयात मधल्या काळात ऑक्सिजनची मोठी आवश्यकता भासत आहे. सध्या महापालिकेला पुरवण्यात येणारा ऑक्सिजन अपुरा पडत असल्यानेही काही कोवीड रुग्णांचे मृत्यू होत असल्याचे राजेश मोरे यांनी पत्रात नमूद केले आहे. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेसह डॉक्टरांच्या राष्ट्रीय तज्ञ समितीनेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे. तिसरी लाट आल्यास आणखी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासणार असून त्यासाठी केडीएमसी प्रशासनाने सुसज्ज असा स्वतःचा ऑक्सिजन प्लॅन्ट लवकरात लवकर उभारण्याची मागणी राजेश मोरे यांनी केली आहे.

कल्याण डोंबिवलीतील पत्रकरांना कोवीड लसीसाठी प्राधान्य द्या”
ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासोबतच कल्याण डोंबिवलीतील सर्व पत्रकारांना प्राधान्याने कोवीड लस देण्याची मागणी राजेश मोरे यांनी केली आहे. पत्रकारही फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे काम करत असून बातम्यांसाठी त्यांना सतत बाहेर फिरावे लागते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांना कोवीड लस देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मागील लेख45 वर्षांवरील नागरिकांचे उद्या 7 मे रोजी कल्याण डोंबिवलीत या 16 ठिकाणी होणार कोवीड लसीकरण
पुढील लेखकल्याण तालुक्यातील कडक निर्बंधांबाबत केवळ प्रस्ताव सादर अद्याप निर्णय नाही – तहसीलदार दिपक आकडे यांची माहिती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा