Home राजकीय घडामोडी शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखा आणि रवि पाटील फाऊंडेशनतर्फे शासकीय योजना शिबिराचे...

शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखा आणि रवि पाटील फाऊंडेशनतर्फे शासकीय योजना शिबिराचे आयोजन

कल्याण दि.5 जानेवारी :
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब गरजू महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांना मिळण्यासाठी शिवसेना बिर्ला कॉलेज विभागीय शाखा आणि रवि पाटील फाऊंडेशनतर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान योजना,जनधन बँक योजना आणि महात्मा फुले जन आरोग्यदायी योजनेंतर्गत विशेष कार्ड वाटप करण्यात आले.

शिवसेना कल्याण शहरप्रमुख आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी परिवाहन सदस्य सुनील खारूक, उपविभाग प्रमुख श्विश्वनाथ जाधव,शाखा संघटक अंजली भोईर, उपशाखा संघटक शिरिण पठाण,मनाली जाधव, उपशाखा प्रमुख शशिकांत श्रीवास्तव, युवासेना उपशहर अधिकारी योगेश पाटील, शाखा अधिकारी अजय हिरवे, उपशाखा अधिकारी स्वप्नील ओंबळे,सुनील वाघ, दिलिप सातारकर, विजय उबाळे त्याचबरोबर रवि पाटील फाऊंडेशनचे अनिरूध्द रवि पाटील, प्रथमेश पाटील,भावेश पाटील,दुर्गेश रवि पाटील,प्रसाद शिंदे,विनायक भोसले आणि प्रथमेश पाटील उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा