Home ठळक बातम्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेची जोरदार निदर्शने

केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेची जोरदार निदर्शने

 

कल्याण – डोंबिवली दि.24 ऑगस्ट :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून कल्याण डोंबिवलीतही ठिकठिकाणी शिवसेनेने निदर्शने केलेली पाहायला मिळाली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल रायगडमध्ये पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याचे दिसत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीतूनही याप्रकरणी शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आलेली पाहायला मिळत आहे. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना- युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुतळ्याला मारहाण करत तसेच कोंबड्या हवेत उडवून यावेळी शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी स्थानिक पोलीस ठाण्यात आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणार असल्याचेही राजेश मोरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे अनेक महिला पदाधिकारी, आणि युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर डोंबिवलीप्रमाणे कल्याण पूर्वेतील गुंजाई चौकातही शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी निदर्शने करण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर आपला संताप व्यक्त केला.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 30 रुग्ण तर 43 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याणात शिवसेनेकडून भाजप शहर कार्यालयावर दगडफेक; भाजप पदाधिकाऱ्यालाही मारहाण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा