Home ठळक बातम्या मतदार यादीतील नावनोंदणीसाठी कल्याणात तृतीयपंथीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदार यादीतील नावनोंदणीसाठी कल्याणात तृतीयपंथीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

कल्याण दि.14 नोव्हेंबर :
निवडणूक आयोगातर्फे संपूर्ण राज्यभरात मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून नविन मतदारांसह आपल्या नाव नोंदणीसाठी पुढे येण्याचे आवाहन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे. तर याच कार्यक्रमांतर्गत यंदा तृतीयपंथीयांचीही नाव नोंदणी होत असून कल्याणात शनिवारी आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.

कल्याण पूर्वेतील मलंग रोडवर असणाऱ्या किन्नर अस्मिता संस्थेच्या पुढाकाराने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी हे विशेष नाव नोंदणी शिबिर राबवण्यात आले. यापूर्वी तृतीयपंथीयांची मतदार यादीत नाव नोंदणी होत नव्हती. मात्र भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या नव्या निर्देशानुसार इतरांप्रमाणे तृतीयपंथीनाही मतदार यादीतील नाव नोंदणीचा अधिकार प्राप्त झाला आहे. मतदार यादीतील नाव नोंदणी आणि मतदान ओळखपत्रासारखा महत्वाचा शासकीय पुरावा आता तृतीयपंथीयांना उपलब्ध होणार आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी बाब असून यामुळे समानतेचा अधिकार आणि समानतेच्या हक्कासाठी ही नाव नोंदणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत किन्नर अस्मिता संस्थेच्या तमन्ना केणे यांनी यावेळी व्यक्त केले. तर मतदार यादीतील नाव नोंदणीसाठी यावेळी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाले.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इतके वर्षे मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींचा आता खऱ्या अर्थाने समानतेच्या दिशेने प्रवास सुरु झाला असे बोलले तर ते चुकीचे ठरणार नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा