Home ठळक बातम्या सिताबाई के.शहा मेमोरियल शाळेबाबत मनसे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सिताबाई के.शहा मेमोरियल शाळेबाबत मनसे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

 

डोंबिवली दि.25 एप्रिल :  
कल्याण शिळ मार्गावरच्या खिडकाळी परिसरात असणाऱ्या सीताबाई के. शहा मेमोरिअल शाळेबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

या शाळेमध्ये राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम बंद करुन सीबीएसई संलग्न अभ्यासक्रम सुरु करण्यात आला होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशाची सक्ती केली जात होती. तसेच मान्यता नसतानाही 8 वी ते 10 वीचे वर्ग सुरु करुन विद्यार्थी -पालकांची फसवणूक केल्याचे सांगता शिक्षण विभागाने याबाबत 450 विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी शाळेच्या पालक समितीने पत्रकार परिषदेत केली होती. याची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर आणि शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करत
पुर्वीप्रमाणेच राज्य मंडळ संलग्न अभ्यासक्रम सुरु ठेवण्याची मागणी केली होती. तसेच या प्रश्नाबाबत पाठपुरावा करत संबंधित विद्यार्थी आणि पालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नही सुरू होते. ज्याला यश आल्याचे सांगत शहा मेमोरियल शाळा व्यवस्थापनाने घेतलेल्या सीबीएसई संलग्न अभ्यासक्रमाच्या निर्णयाला शिक्षण विभागाने स्थगिती दिल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले. तसेच शाळा व्यवस्थापनाने पुर्वीप्रमाणेच राज्य मंडळ संलग्न अभ्यासक्रम सुरु ठेवण्याबाबतचे निर्देश देत त्याबाबतचे पत्रही ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने काढल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा