Home ठळक बातम्या ट्रक चालकांचा संप ; कल्याण डोंबिवलीतही पेट्रोल आणि सीएनजी भरण्यासाठी तूफान गर्दी

ट्रक चालकांचा संप ; कल्याण डोंबिवलीतही पेट्रोल आणि सीएनजी भरण्यासाठी तूफान गर्दी

कल्याण दि. 2 जानेवारी :

राज्यातील ट्रक चालकांनी कालपासून पुकारलेल्या संपामुळे पेट्रोल आणि सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याच्या भितीने सामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि सी एन जी भरण्यासाठी कल्याण डोंबिवलीही विविध पंपांवर वाहन चालकांनी मोठी गर्दी केली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या हिट अँड रन कायद्याविरोधात राज्यातील ट्रक चालकांनी कालपासून हा संप पुकारला आहे. ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसोबत अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपाचा आज दुसरा दिवस असून पेट्रोल आणि सी एन जी मिळणार नाही या भितीपोटी कल्याण डोंबिवलीतील विविध पंपांवर वाहन चालकांनी एकच गर्दी केली आहे. काल रात्रीपासूनच शहरांतील पेट्रोल पंपांबाहेरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ज्यामध्ये कार चालकांसोबत दुचाकीस्वारांची संख्याही लक्षणीय आहे. तर दुसरीकडे सी एन जी पंपावरही गॅस भरण्यासाठी वाहन चालकांनी मोठी गर्दी केली आहे.

पेट्रोल आणि सी एन जी संपले तर काय करायचे? या भितीपोटी वाहन चालक पंपावर गर्दी करत असून या संपावर सरकार कधी तोडगा काढणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा