Home ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सायक्लोथॉनसह विविध...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सायक्लोथॉनसह विविध उपक्रम

कल्याण दि. 1 फेब्रुवारी :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शहरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमूख रवी पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

येत्या 4 फेब्रुवारी रोजी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा तर त्यानंतर दोनच दिवसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आमदार भोईर आणि शहरप्रमुख पाटील यांच्यातर्फे 4 फेब्रुवारीपासून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

4 फेब्रुवारी रोजी कल्याण पश्चिमेतील सिद्धी विनायक गार्डन हॉल येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सुमारे तीन ते चार हजार नागरिक सहभागी होणार आहेत.

तसेच 5 फेब्रुवारी रोजी दुर्गाडी चौक ते यशवंतराव चव्हाण क्रीडांगण अशी सायक्लोथॉन स्पर्धा होणार असून यामध्ये सातशे सायकलपटू सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

तर 7 फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे सकाळी 8 ते 10 यावेळेत चित्रकला, निबंध लेखन, योगा आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा असेल. तर त्याचदिवशी सायंकाळी 5 ते 8 यावेळेत गायन, वादन, नृत्य, लोककला, पारंपरिक कला, लावणी, बाल काव्यवाचन आदी स्पर्धा होणार असल्याची माहिती आयोजक आमदार विश्वनाथ भोईर आणि शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.

या सर्व स्पर्धा विनामूल्य असून 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंराव चव्हाण क्रीडांगण येथे त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा