Home ठळक बातम्या महाराष्ट्रातील आपला प्रवास यापूढेही असणार – भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे

महाराष्ट्रातील आपला प्रवास यापूढेही असणार – भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे

कल्याण दि.30 जुलै :
आगामी निवडणुकीकरता आपल्याला उतरवल्याचा कोणताही विषय नाही. गेल्या 2 वर्षांपासून आपल्यावर पक्षाने हरियाणाची जबाबदारी सोपवल्याने साहजिकच आपले बऱ्यापैकी तिकडे जाणे होते. तर 10 दिवस आपण महाराष्ट्रात फिरत असतो आणि महाराष्ट्रातील आपला प्रवास यापूढेही असणार असे सूचक विधान भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. कल्याण पूर्वेतील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सूचक विधान केले.

तर भाजप मनसे युतीच्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की सहजच कोणी कोणाची भेट आणि चर्चा झाली म्हणून पतंग उडवण्यात मजा नाही. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून अशा प्रकारच्या सर्व कल्पना खऱ्या नसतात असे मतही त्यांनी भाजप मनसे युतीवर व्यक्त केले.

दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारण सक्रीय दिसत नसल्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रश्नावर कोणतेही भाष्य केले नाही. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत केडीएमसीतर्फे उद्या (30 जुलै) 24 ठिकाणी लसीकरण; मिळणार केवळ 2 रा डोस
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 73 रुग्ण तर 63 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा