Home क्राइम वॉच कल्याण पूर्वेत कचरा डंपरच्या धडकेत 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कल्याण पूर्वेत कचरा डंपरच्या धडकेत 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कल्याण दि.22 मे :
डंपरने दिलेल्या धडकेत एका 12 वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागल्याची घटना कल्याण पूर्वेतील कचोरे गावात घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.
अमित धाकड असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव असून कचोरे गावदेवी मंदिर परिसरात तो आपल्या मित्रांसमवेत खेळत होता. खेळता खेळता चेंडू त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला. तो घेण्यासाठी गेलेला अमितला शेजारीच कचरा उचलण्यासाठी आलेल्या डंपरने मागून धडक दिली. डंपरची जोरदार धडक बसल्याने अमित तिकडेच खाली कोसळला आणि गाडीच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर आसपास असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यावर चालकाने त्याला घेऊन रुग्णालय गाठले खरे मात्र डॉक्टरांनी अमितला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे.

मागील लेखउद्याही (23 मे) कल्याण डोंबिवलीत कोवीड लसीकरण बंद राहणार – केडीएमसीची माहिती
पुढील लेखकौतुकास्पद: कोरोनामुळे आलेली मानसिक मरगळ दूर करण्यास सरसावली शैक्षणिक संस्था

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा