Home ठळक बातम्या कल्याण-शिळ रोडवरील नामांकित गृहप्रकल्पाच्या कामगार वसाहतीमध्ये भीषण आग; एकाचा मृत्यू

कल्याण-शिळ रोडवरील नामांकित गृहप्रकल्पाच्या कामगार वसाहतीमध्ये भीषण आग; एकाचा मृत्यू

 

डोंबिवली दि.21 फेब्रुवारी :

डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शीळ रोडवर उसरघर येथे असलेल्या रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज 2 मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीला आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.

काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने या वसाहतीत कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 120 खोल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. आग लागताच कामगारांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र तरीही या आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक कामगार भाजल्याने गंभीररित्या भाजला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव तपन महालदार असून सुरेश कुमार अस जखमी कामगाराचे नाव आहे. दरम्यान या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यानी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासणीत ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीत कामगार वसाहतीतील सर्व सामानाची राखरांगोळी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कामगारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा