Home ठळक बातम्या डोंबिवलीमध्ये सुसज्ज असे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवलीमध्ये सुसज्ज असे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

डोंबिवली पश्चिमेतील देखण्या बगीचाचा लोकार्पण सोहळा

डोंबिवली दि. 20 जून :
डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात असणाऱ्या पालिकेच्या भूखंडावर अद्ययावत आणि आधुनिक सुविधांनी सज्ज असे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभाणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

डोंबिवली पश्चिमेला माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या अत्यंत देखण्या अशा बगीचाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

कल्याण डोंबिवलीत असणाऱ्या पालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर अशा प्रकारची सुदंर उद्याने उभारण्याची गरज आहे. याच संकल्पनेतून खंबाळ पाडा येथे सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. याबाबतचा डीपीआरही तयार करण्यात आला असून याठिकाणी क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, लाँग टेनिस, रनिंग ट्रॅकसह इंडोर गेम्ससाठी अद्ययावत पद्धतीने सुविधा उपलब्ध होणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी १० कोटीचा निधी दिला उपलब्ध करून देण्यात येणार असून आणखी निधी लागल्यास तोही दिला जाईल असे खासदार डॉ. शिंदे यांनी आश्वासन दिले.

माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे – जयेश म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून हे आनंद नगर उद्यान साकारण्यात आले आहे. नगर विकासमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोकार्पण सोहळ्याला ऑनलाईन उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या. या उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी, खेळताना पडल्यास मुलांना इजा होवू नये म्हणून मॅट, आधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेले वॉटर फाऊंटन आदी सुविधा या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

मागील लेखदहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या कचरावेचक मुलांचा शिवसेनेनं केला गौरव
पुढील लेखकेंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात दाल सरोवराच्या काठावर योग प्रात्यक्षिके

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा