Home ठळक बातम्या विविध प्रश्नांवर शासनाकडून दखल घेतली जात नसल्याविरोधात कल्याणात शिक्षण अभ्यासकाचे आत्मक्लेश उपोषण

विविध प्रश्नांवर शासनाकडून दखल घेतली जात नसल्याविरोधात कल्याणात शिक्षण अभ्यासकाचे आत्मक्लेश उपोषण

 

कल्याण दि. १५ सप्टेंबर :
राज्यातील १० वी -१२ वी विद्यार्थ्यांच्या, महिला-बाल अत्याचारसह विविध घटकांच्या आणि वैयक्तिक ज्वलंत समस्यांबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याविरोधात शिक्षण अभ्यासक महेंद्र बैसाणे यांनी आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आपण आपल्या राहत्या घरीच हे उपोषण करीत असल्याची माहिती बैसाणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील १० वी -१२ वी विद्यार्थ्यांच्या, महिला-बाल अत्याचारसह विविध घटकांच्या आणि वैयक्तिक ज्वलंत समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती करणारी पत्रे निवेदने आपण वेळोवेळी महाराष्ट्र शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना दिली. परंतु त्यावर आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आपण हे बेमुदत आत्मक्लेश उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बैसाणे यांनी दिली.

तसेच पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन – प्रशिक्षण परिषदे(SCERT)च्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांना आपण ई मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनाबाबत प्रचंड उदासीनता दाखवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच १३ तारखेपासून आपण उपोषणाला बसणार असल्याचे माहित असतानाही एमएसईआरटी पुणेने आपल्याला १९ सप्टेंबरला चर्चेला बोलवल्याची माहितीही बैसाणे यांनी दिली. त्यासोबतच मुख्यमंत्री कार्यालयाला केलेल्या ई मेलचीही पोहोच मिळाली असून कार्यवाहीची अजून अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा