Home कोरोना ‘ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन’तर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत; आंतराष्ट्रीय स्पर्धेतील सौंदर्यवतींची प्रमूख...

‘ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन’तर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत; आंतराष्ट्रीय स्पर्धेतील सौंदर्यवतींची प्रमूख उपस्थिती

डोंबिवली दि.5 जानेवारी :
कोरोनामूळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लॉकडाऊनचा अनेकांना मोठा फटका बसला असून अनेकांच्या रोजगार आणि व्यवसायांवर गदा आली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आणि मिशन बिगीन आगेनअंतर्गत सहा महिने उलटले तरीही अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटलेलीच आहे. या पार्श्वभूमीवर ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशन या सामाजिक संघटनेने पुढाकार घेत आज अनेक गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशनच्या द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टअंतर्गत डोंबिवली पूर्वेतील आयरे गावात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे या सामाजिक उपक्रमाला इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या मिस टीन इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अस्मि भिडे, मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील मोहिका गद्रे आणि मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अमृता दिक्षीत यांची प्रमुख उपस्थिती होती. या सौंदर्यवतींच्या उपस्थितीत आयरे गावातील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची आणि मुलांना शालेयोपयोगी वस्तूंची यावेळी मदत करण्यात आली. यावेळी ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशनच्या अनुष्का गोसावी, वृंदा पोतदार आणि प्रियांका सोनकर आदी प्रतिनिधीही उपस्थित होते.

कोरोनामूळे लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला असून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया ड्रीम अँड बिलिव्ह फाउंडेशनच्या डॉ. स्वरूप पुराणिक यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा