Home ठळक बातम्या रमजान ईदनिमित्त कल्याण शहराच्या वाहतुकीत बदल

रमजान ईदनिमित्त कल्याण शहराच्या वाहतुकीत बदल

(file photo)

कल्याण दि. 1 मे : 
रमजान ईदनिमित्त कल्याण पश्चिमेच्या दुर्गामाता चौक, गोविंदवाडी बायपास परिसरातील मार्गावर 3 मे रोजी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

पुढीलप्रमाणे असणार वाहतुकीत बदल…

प्रवेश बंद – कल्याण शहरातील लालचौकीकडून भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लालचौकी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – या मार्गावरील सर्व वाहने लालचौकी येथे उजवीकडे वळण घेवून आधारवाडी चौक – वाडेघर सर्कल मार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद – भिवंडीकडून कल्याण शहरात आग्रा रोडमार्गे, गोविंदवाडी बायपासमार्गे कल्याणकडे येणाऱ्या सर्व वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – या मार्गावरील सर्व वाहने दुर्गामाता चौक येथे डावीकडे वळण घेवून वाडेघर  सर्कल- आधारवाडी चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – कल्याण (पूर्व) कोळसेवाडी बाजूकडून गोविंदवाडी बायपासमार्गे दुर्गामाता चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना पत्रीपुल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – या मार्गावरील सर्व वाहने पत्रीपुल – छत्रपती शिवाजी महाराज चौक – लाल चौकी येथे उजवे वळण घेवून आधारवाडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – कल्याण शहराअंतर्गत दुर्गाडी चौक, गोविंदवाडी बायपास, पत्रीपुलमार्गे आणि दुर्गाडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पत्रीपुलमार्गे जाणाऱ्या कंटेनर, ट्रेलर इत्यादी मल्टीएक्सल / जड –अवजड वाहनांना रमजान ईदच्या दिवशी दिवसा आणि रात्रौ प्रवेश बंद करण्यात येणार असल्याची माहितीही वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान ही वाहतुक अधिसुचना रमजान ईदच्या दिवशी म्हणजेच 3 मे 2022 रोजी किंवा 4 मे 2022 रोजी मध्यरात्रीपासून ते नमाज पठणाचा कार्यक्रम संपेपर्यंत अंमलात राहणार आहे. तसेच ही अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचेही पोलीस उपआयुक्त पाटील यांनी सांगितले आहे.

मागील लेखमहाराष्ट्र दिनानिमित्त भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे पोलीस बांधवांसाठी अनोखी भेट
पुढील लेखआकर्षक रोषणाईने फुलले छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्य

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा