Home कोरोना कल्याण डोंबिवलीतही कोविशील्ड लसीकरण सुरु; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली पहिली लस

कल्याण डोंबिवलीतही कोविशील्ड लसीकरण सुरु; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली पहिली लस

 

कल्याण दि.16 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीतही आजपासून कोविशील्डच्या लसीकरणाला सुरुवात झाली. रुक्मिणीबाई रुग्णलयात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना पहिली लस देण्यात आली. त्यापाठोपाठ आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील डॉक्टर,नर्सेस वार्ड यांनाही ही पहिली लस देण्यात आली.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय आणि कल्याण पूर्वेतील शक्तीधाम विलगिकरण केंद्र येथे लसीकरण सुरू करण्यात आले. लोकांच्या मनातील भिती घालवण्यासाठी स्वतः प्रथम आपण डोस घेतल्याची प्रतिक्रीया केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली. तर मार्चमध्ये कोरोना प्रादुर्भाव सुरू झाला, त्यावेळी पलीकडे कुठेच प्रकाश दिसत नव्हता. आज मात्र आनंदाचा दिवस असून कोरोनाच्या लढ्याविरोधात महत्वाचा टप्पा गाठल्याची प्रतिक्रीया केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
दरम्यान कल्याण डोंबिवलीतील या लसीकरण केंद्रांवर दररोज 100 नोंदणीकृत स्वयंसेवकांचे लसीकरण केले जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा