Home ठळक बातम्या डोंबिवलीतील बाल पक्षी निरीक्षक ठरतोय कौतुकास पात्र

डोंबिवलीतील बाल पक्षी निरीक्षक ठरतोय कौतुकास पात्र

 

डोंबिवली दि.30 जून :
सांस्कृतिक उपराजधानी असा नावलौकिक मिळवलेल्या डोंबिवली नगरीतील बाल पक्षी निरीक्षक सध्या सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे. अवघ्या सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अर्णव पटवर्धन या बाल पक्षी निरीक्षकाचा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी नुकताच सत्कार केला. शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमूख राजेश मोरे यांच्या पुढाकाराने हा सत्कार करण्यात आला.

डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर शाळेत शिकणाऱ्या अर्णवला लहानपणापासूनच पक्षी निरीक्षणाची आवड आहे. त्यात गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाने आणखी भर पडली. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अर्णव इमारतीच्या गच्चीवर जाऊन पक्ष्यांचे निरीक्षण तर करायचाच पण त्यासोबत त्यांचे छायाचित्रेही तो काढू लागला. हळूहळू घराच्या आसपास असणाऱ्या परिसरात जाऊन अर्णवने डोंबिवलीमध्ये असणारे पक्षी आणि त्यांच्या विविध प्रजातींचा अभ्यास सुरू केला. विविध पुस्तकांचे वाचन आणि छायाचित्रणाचे तंत्रशुद्ध शिक्षणही त्याने घेतले असून मोठे होऊनही आपल्याला पक्षी निरीक्षकच व्हायचे असल्याचे अर्णवने सांगितले. तर डोंबिवलीत येणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहता एखादे पक्षी अभयारण्य असावे अशी त्याची मनापासून इच्छा आहे.
डोंबिवली आतापर्यंत त्याने आशियाई कवडी, पळस अशा विविध प्रकारच्या मैना, शिंपी, शिंजीर, हळद्या, तांबट, बुलबुल, दयाळ, नाचण आदी पक्षी आपल्या कॅमेऱ्यात आणि वहीमध्ये टिपले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा