Home ठळक बातम्या श्रीराम मंदिर उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून 5 लाखांचा निधी

श्रीराम मंदिर उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून 5 लाखांचा निधी

डोंबिवली दि.24 फेब्रुवारी :

समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान आणि स्वप्न असलेल्या अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत असून राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा, अशी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही मंदिर उभारणीत सक्रिय सहभागी होत 5 लाख रुपयांची देणगी दिली. डोंबिवली येथील गणेश मंदिरचे विश्वस्त मधुकर चक्रदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुरेश फाटक, प्रदीप पराडकर यांच्याकडे 5 लाख रुपयांचा धनादेश डॉ. शिंदे यांनी सुपूर्द केला. ‘फुल ना फुलाची पाकळी’ या स्वरुपात राममंदिर उभारणीच्या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाल्याची भावनिक प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली.

अयोध्येतील राममंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं. त्यानंतर आता राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी अभियानाला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) १० अब्ज रुपये जमा करण्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेने केला आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर 1 हजार वर्ष टिकावे, या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे. मंदिर उभारणीसाठी प्रदीर्घ लढा लढण्यात आला. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून श्रीरामांच्या जन्मस्थानी पुन्हा विराजमान होणार असल्याची भावना देशभरातील भाविकांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकालाच या मंदिर उभारणीत योगदान देण्याची इच्छा असून खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपले योगदान दिले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा