Home ठळक बातम्या कल्याणात 10वी -12वीच्या विद्यार्थ्यांना देशातील बड्या युनिव्हर्सिटीकडून मोफत मार्गदर्शन

कल्याणात 10वी -12वीच्या विद्यार्थ्यांना देशातील बड्या युनिव्हर्सिटीकडून मोफत मार्गदर्शन

केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

कल्याण दि.17 जुलै :
10 वी आणि 12 वी म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा. त्यातही कोवीडनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने विद्यार्थ्यांच्या गोंधळात आणखीनच भर घातली. विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला हा गोंधळ दूर करण्यासाठी अखेर विद्यार्थीच विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले आहेत. हा गोंधळ कमी करण्यासाठी कल्याणातील ‘द केम्ब्रिआ इंटरनॅशनल’ शाळेच्या विद्यार्थ्यांकडून ‘माय करिअर माय डिसिजन’ हे मोफत ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. ज्यामध्ये देशातील 15 हून अधिक नामांकित युनिव्हर्सिटीचे तज्ञ व्यक्ती सहभागी होणार असून 10 वी -12वीच्या विद्यार्थ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

10 वी असो की 12 वी या दोन्ही टप्प्यावर करिअरचा निर्णय घेणे काहीसे अवघड काम असते. त्यात कोरोनानंतर निर्माण झालेल्या सध्याच्या गोंधळाच्या परिस्थितीनंतर तर ही आणखीनच कठीण गोष्ट झाली आहे. त्यामुळेच केम्ब्रिआ शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हे सेमिनार आयोजित केले आहे. दोन सत्रात होणाऱ्या या मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनारमधून 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यामध्ये सिम्बॉयसिस, अशोका, फ्लेम, डी. वाय. पाटील, केआरईए, एनएमआयएमएससारख्या देशातील टॉप युनिव्हर्सिटीचे तज्ञ व्यक्ती सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

येत्या मंगळवारी 20 जुलै रोजी हे ऑनलाईन सेमिनार होणार असून यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केम्ब्रिआ शाळेतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या ऑनलाईन सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक http://mycareer.cambriaschool.com/ आणि संपर्क :- 98336 13947.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा