Home ठळक बातम्या मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून कोकणातील पुरग्रस्त भागांची पाहणी

मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून कोकणातील पुरग्रस्त भागांची पाहणी

तळीये गावासाठी 11 लाखांची मदत

डोंबिवली दि. 4 ऑगस्ट :
मनसे आमदार राजू पाटील हे कोकणातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी तळीये गावासाठी 11 लाखांची मदतही केली आहे. मूसळधार पावसामुळे महाड, खेड, चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरात पूर आला होता. यात अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

या पूरग्रस्तांच्या सेवेला सामाजिक संस्था आणि मनसे कार्यकर्ते धावून गेले आहेत. पूरग्रस्तांना डोंबिवली मनसेतर्फेही अन्नधान्य, कपडे तसेच गृहउपयोगी वस्तू देण्यात येत आहेत. यासाठी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्यांचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी महाड, तळीये, खेड येथे पाहणी करत नागरिकांशी संवाद साधत मनसेकडून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गावात जाऊन मनसे आमदार पाटील यांनी पाहणी केली. तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला. या गावासाठी आमदार राजू पाटील यांच्याकडून 11 लाख रुपयांची मदत करण्यात आली. त्याचसोबत खेड गावातील बाजारपेठेचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सरचिटणीस मनोज चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, संदीप म्हात्रे , योगेश पाटील यांच्यासह महाड, खेड आणि डोंबिवलीचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा